- झारखंडच्या देवघर जिल्ह्यात आज पहाटे एक भीषण अपघात घडला आहे. श्रावण महिन्यात बाबा बैद्यनाथ धाम दर्शनासाठी निघालेल्या कावड यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस भरधाव वेगात समोरून येणाऱ्या गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात १९ कावडियांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक भाविक गंभीर जखमी झाले आहेत.
- ही दुर्घटना आज पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. देवघर जिल्ह्यातील गोड्डा-देवघर मुख्य मार्गावर मोहनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जंगल परिसरात ही भीषण धडक झाली. कावड यात्रा करणारे हे भाविक बसमधून देवघरच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकला बसने धडक दिली.
- अपघात जंगल भागात झाल्याने मदतकार्यात अडथळे येत होते. अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिस, अग्निशमन दल व आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केले. जखमींना नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून काहींना देवघरमधील मोठ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
- विशेष म्हणजे, बस ज्या ट्रकवर आदळली ती ट्रक गॅस सिलेंडर घेऊन जात होती. त्यामुळे अपघातानंतर भीषण स्फोट होण्याचा धोका होता. मात्र सुदैवाने गॅस सिलेंडरना आग लागली नाही आणि मोठा अनर्थ टळला. तरीही वाहनांच्या मोडकळीसोबत अनेक मृतदेहांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता.
ब्रेकिंग! पहाटे भीषण अपघात, बस ट्रकवर आदळली
