नागपंचमी: श्रद्धा, जागरूकता आणि सहजीवनाचा उत्सव

Admin
6 Min Read
  • नागपंचमी हा एक पारंपरिक हिंदू सण आहे, ज्यामध्ये लोक सर्पांची—विशेषतः नागांची—पूजा करून त्यांना भक्तीभावाने वंदन करतात. मराठी पंचांगानुसार नागपंचमी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरी केली जाते, जी सामान्यतः जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात येते. भारतातील अनेक भागांमध्ये या दिवशी विशेष महत्त्व असते, कारण लोक सर्पदेवतांना प्रार्थना करून संरक्षण आणि आशीर्वाद मागतात.परंतु नागपंचमी हा केवळ धार्मिक विधी नसून, निसर्गातील सापांचे महत्त्व समजून घेण्याचा आणि त्यांचे संरक्षण करण्याचा संदेश देणारा एक अर्थपूर्ण दिवस देखील आहे. हेच न्हवे तर साप् हे शेतकराचे मित्र आहेत .श्रावण महिन्यात नागपंचमी साजरी केली जाते त्याच्या आधी नुसत्याच पेरण्या होऊन पिक उगवून आलेलं असतं आणी त्या पिकाची सुरक्षा साप हा प्राणी उंदीर या सारखे उपद्रवी प्राणी खाऊन करत असतो .हा सणं निसर्गाशी निगडित असून निसर्गाप्रती क्रूतज्ञता वक्त करण्यासाठी साजरा केला जातो.
  • विशेषतः नाग (कोब्रा) यांची पूजा केली जाते, कारण ते अनेक हिंदू देव-देवतांशी संबंधित आहेत.जसं भगवान शिव यांच्या गळ्यात वासुकी नाग आहे, आणि भगवान विष्णू शेषनागावर विसावलेले आहेत त्याचबरोबर श्री कृष्ण यांनी युद्धामध्ये कालिया नागावर मिळवलेला विजय , तसेच् आपल्या हिंदू संस्कृतीनुसार तक्षक(अरण्याचा राजा ) ,कर्कोटक(तेजाने प्रज्वलीत झालेला नाग ), शंखापाल ,पद्मा ,महापद्मा (संपतीचा नाग), व कुलिका याचे सुद्धा भारतीय् पुरणांमध्ये उल्लेख आहेत .या दैवी संबंधांमुळे आणि नागांच्या तेजस्वी रूपामुळे त्यांना पवित्र मानले जाते.या सणामध्ये नागांच्या पूजेला महत्त्व दिलं जात असलं, तरी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की फक्त नागच नव्हे, तर सर्व प्रकारचे साप हे निसर्गाचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांना सुद्धा आदर व संरक्षण मिळणं आवश्यक आहे.
  • हा उत्सव राज्यागणिक वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो, प्रत्येक ठिकाणी त्याच्या खास रूढी आणि परंपरा असतात. मात्र, या विविध उत्सवांना एकत्र जोडणारी एक सामान्य गोष्ट म्हणजे विशेष अन्नाची तयारी, जी सर्पदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आणि भक्तांना आशीर्वाद मिळावा यासाठी केली जाते.
  • बऱ्याच ठिकाणी नागपंचमी ही वेगवेगळ्या स्वरूपात साजरी केली जाते त्याचे एक उदाहरणं म्हणजे बत्तीस शिराळा येथे जिवंत नागांची पूजा केली जाते . ही प्रथा स्थानिक आख्यायिकेवरून उगम पावते जिथे गोरक्षनाथ नावाच्या एका ऋषीने गावात साप प्रकट केले होते असे म्हटले जाते आणि तेव्हापासून या दिवशी सापांची पूजा केली जाते . न्यायालयाच्या आदेशांमुळे जिवंत साप हाताळण्याची प्रथा मर्यादित आली असली तरी, हा उत्सव या प्रदेशासाठी एक महत्त्वाचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे.
  • त्याचबरोबर महाराष्ट्रात काही ठिकाणी वारूळे देखिल् पुजली जातात ,परंतु नाग हे वारुळात राहतात हे एक् असत्य आहे.
  • भारतातील चार अत्यंत विषारी सापांना ‘बिग फोर’ म्हणून ओळखले जाते – नाग (स्पेक्टॅकल्ड कोब्रा), मण्यार (क्रेट), घोणस(रसेल वायपर) आणि फुरसें (सॉ-स्केल्ड वायपर). आपली आणि इतरांची सुरक्षितता राखण्यासाठी या सापांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.भारतामध्ये फक्त हे चार जातीचे साप् विषारी असतात बाकी साप् हे बिनविषारी आणि अर्ध्‌विषारीअसतात तरी भीतीपोटे त्यांना मारले जाते.पण हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की हे साप आपले शत्रू नाहीत. ते देखील इतर प्राण्यांप्रमाणे फक्त आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत असतात.
  • पावसाळ्याच्या काळात, साप उंदीर किंवा बेडूक यांसारख्या अन्नाच्या शोधात घरात किंवा शेतात येतात. याचा अर्थ असा नाही की ते आपल्याला इजा करणार आहेत. जर आपण आपले आजूबाजूचे परिसर स्वच्छ ठेवले आणि कचरा किंवा उंदीर लपण्याच्या जागा काढून टाकल्या, तर सापांच्या मानवी वस्तीमध्ये येण्याची शक्यता कमी होते. जर साप दिसला, तर त्याला पकडण्याचा ,मारण्याचा किंवा त्याचे खेळ करण्याचा प्रयत्न करू नका. प्रशिक्षित वन्यजीव रक्षक किंवा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवा. आज अनेक संस्था आणि व्यक्ती सापांना सुरक्षितपणे पकडून जंगलात परत सोडण्यासाठी काम करत आहेत.
  • नागपंचमीच्या दिवशी सापांचे दर्शन घडवणारे सापबाज बहुधा सापांना अत्यंत वाईट स्थितीत ठेवतात.त्यांचे खेळ करतात, त्तोंड शिवतात किंवा त्यांना उपाशी ठेवतात – जे अत्यंत क्रूर आणि वेदनादायक असते. याशिवाय, हे सर्व भारताच्या वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 अंतर्गत बेकायदेशीर आहे. भारतातील सर्व साप – विषारी किंवा बिनविषारी – हे कायद्याने संरक्षित आहेत. त्यांना पकडणे, इजा करणे ,खेळवणे किंवा त्यांना मारणे हा दंडनीय गुन्हा आहे.जर वन्य आणि वन्यजीव याच्याबाबतीत कोणतीही समस्या असेल तर तुम्ही टोल फ्री नंबर (1926)यावर कॉल करू शकता. सापांची पूजा करायची असेल, तर प्रतिमा, मूर्ती किंवा चिन्हांच्या माध्यमातून करूया – जिवंत सापांचा उपयोग करू नये.
  • सापानबद्दल् प्रबोधन करणे खूप महत्त्वाचे आहे, विशेषतः ग्रामीण भागांमध्ये जिथे सर्पदंश अधिक प्रमाणात होतात. सर्पदंशाच्या आपत्कालीन प्रसंगी काय करावे हे लोकांना माहीत असणे आवश्यक आहे. सर्वात पहिले शांत राहणे आणि त्या व्यक्तीस तातडीने रुग्णालयात नेणे आवश्यक आहे. जखम कापणे, विष शोषून काढणे किंवा घरगुती उपाय वापरणे – हे सर्व घातक असते. केवळ वैद्यकीय उपचार आणि प्रतिविष (antivenom) यामुळेच प्राण वाचू शकतात. रात्री बाहेर फिरताना बूट घालणे, टॉर्च वापरणे, आणि पलंगावर झोपणे – हे सर्पदंश टाळण्यासाठी उपयुक्त ठरते. मुलांना सापांवर दगड किंवा काठ्या फेकू नये असे शिकवले पाहिजे. त्याऐवजी, त्यांना सर्व सजीव प्राण्यांचा आदर करायला शिकवा आणि साप हे सहजीवनाचा भाग आहेत हे समजावून सांगा.या नागपंचमीला आपण सापांची पूजा भीतीने नव्हे, तर ज्ञानाने करूया. सजीव सापांची पूजा करणे थांबवूया, सापबाजांना पाठिंबा देणे थांबवूया, आणि सापांचे संरक्षण आणि बचाव करण्यासाठी मदत करूया. आपण इतरांना – मित्र, कुटुंब, शेजारी – सापांसोबत सुरक्षितपणे कसे राहावे आणि साप का महत्त्वाचे आहेत हे शिकवूया. शिकून, सामायिक करून आणि काळजी घेऊन आपण या अद्भुत प्राण्यांचे रक्षण करू शकतो, जे आपल्या शेती, जंगल आणि संपूर्ण पृथ्वीला शांततेने मदत करत असतात. साप आपले शत्रू नाहीत – ते मानवाचे मदतनीस आहेत. या खास दिवशी, आपण त्यांच्याप्रती आदर, प्रेम आणि जागरूकतेसह साजरी करूया नागपंचमी.
  • वरील महत्वपुर्ण माहिती आम्हला सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांच्या मार्गदर्शनामुळे आणी त्यांच्या (महाराष्ट्रातील साप) या पुस्तकामुळे मिळाली.
  • सह्याद्रीच्या निसर्गासाठी
  •     सेवेचे ठाई तत्पर
  • कु. आरती मारुती देसाई
  •            निरंतर…..
  • D.Y.Patil Technical Campus, Talsande.
  • (T.Y.Electrical)
Share This Article