क्राईम

पुण्याच्या हायप्रोफाईल सोसायटीत राडा

  • पुण्यात हायप्रोफाईल गहुंजेतील लोढा सोसायटीत सराईत गुन्हेगार असणाऱ्या किशोर भेगडे याने अल्पवयीन मुलांना मारहाण केली आहे. याप्रकरणी भेगडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोढा सोसायटीमध्ये भेगडे याचा मुलगा आणि काही मित्र हे क्लब हाऊसमध्ये खेळत होते. किरकोळ कारणावरून खेळणाऱ्या या मुलांमध्ये वाद झाला. याची माहिती मिळताच भेगडे हा क्लब हाऊसमध्ये आला आणि त्याने या वादाचा जाब विचारात अल्पवयीन मुलांना जबर मारहाण केली.
  • यामध्ये एका पंधरा वर्षाच्या मुलाला भेगडे याने मारहाण केली. त्याच्या पोटात बुक्की मारली. याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. भेगडे हा मुलांना मारत असताना तिथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण हा भेगडे कोणाचेच ऐकायला तयार नव्हता. त्यानंतर भेगडे याने मारहाण केलेल्या 15 वर्षीय मुलाच्या नातेवाईकांनी थेट शिरगाव पोलीस ठाणे गाठत भेगडे विरोधात जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
  • या तक्रारीनंतर भेगडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भेगडे हा राजकीय घरातील आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या बापू भेगडे यांचा तो पुतण्या आहे. यापूर्वीही भेगडेवर एक खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे सराईत असणाऱ्या या गुंडाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Back to top button