ऑनलाइन गेमच्या नादापायी मुलाने आईचा जीव घेतला, बापाने पुरावा नष्ट केला

Admin
2 Min Read
  1. एका तरुणाने आपल्या सावत्र आईची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी वडील आणि मुलाने मृतदेह दफन करून नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवले होते. मात्र गुन्हे शाखा 2 च्या पथकाने 24 तासांच्या आत हा बनाव उघडकीस आणला. वसईत आर्शिया खुसरु (61) ही महिला वसई पश्चिमेच्या बाभोळा येथील पेरियार अपार्टमेंटमध्ये एकटीच रहात होती.
  2. तिचा पती अमीर खुसरो हा पहिली पत्नी आणि मुलांसह वसई पूर्वेच्या गोखिवरे येथे राहतो. त्याचा टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्याचा मुलगा इम्रान खुसरु (32) याला मोबाईल गेम खेळण्याचे व्यसन होते. त्याला गेम खेळण्यासाठी एक लाख 80 हजारांची गरज होती. त्याने हे पैसे सावत्र आई आर्शियाकडे मागितले होते. परंतु तिने पैसे दिले नाही. त्यामुळे इम्रान बाभोळा येथील आर्शिया यांच्या घरी गेला आणि तिला लाथाबुक्क्याने मारहाण करून डोके आपटून तिची हत्या केली.
  3. हा प्रकार नंतर त्याने वडील आमिर खुसरु याला सांगितला. त्या दोघांनी मग मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवले. एका डॉक्टरकडून मृत्यू दाखला घेतला आणि शनिवारी संध्याकाळीच घाईत धार्मिक रितीरिवाजात दफनविधी उरकून टाकला.
  4. दरम्यान रविवारी कामवाली बाई घरात आल्यानंतर तिला घरात रक्ताचे डाग दिसल्यानंतर संशय आला. त्यानंतर याबाबत पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना माहिती देण्यात आली.
  5. कौशिक यांनी गुन्हे शाखा 2 च्या पथकाला तपास करण्याचे आदेश दिले. या पथकाने 24 तासात तपास करून आरोपी इम्रान आणि वडील आमिर खुसरु या दोघांना अटक केली. त्यांच्यावर वसई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Share This Article