महाराष्ट्राची लेक वर्ल्ड चॅम्पियन

Admin
1 Min Read
  • महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नागपूरच्या दिव्या देशमुखने विजय मिळवला आहे. कोनेरू हम्पीला हरवून दिव्याने विजेतेपद पटकावले. FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. हम्पीला पुनरागमन करण्याची एक छोटीशी संधी होती, परंतु ती त्याचा फायदा घेऊ शकली नाही. दिव्याने शानदार विजय नोंदवला.
  • रविवारी बटुमी येथे झालेल्या महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्याने कोणतीही कसर सोडली नाही. उच्च रँकिंग असलेली ग्रँडमास्टर हम्पीला ड्रॉमध्ये रोखले. अंतिम सामना टायब्रेकरमध्ये नेला. दिव्याने आज जॉर्जियातील बटुमी येथे झालेल्या FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषकाचे विजेतेपद जिंकण्यासाठी टायब्रेकरमध्ये हम्पीला हरवले.
  • दिव्याने हम्पीला टायब्रेकमध्ये हरवून 2025 चा FIDE महिला विश्वचषक विजेता बनली आहे. ती भारताची 88 वी ग्रँडमास्टर बनली आहे. 
Share This Article