- बारामतीमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. बारामतीच्या खंडोबानगर रविवारी भयंकर अपघात झाला. डंपरने बाईकला धडक दिल्याने झालेल्या या अपघातात वडील आणि सोबत असलेल्या दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर मुलगा आणि दोन नातींच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र आचार्य यांचाही मृत्यू झाला. एकाच घरातील चौघांचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने बारामती शहर सुन्न झाले आहे.
- समोर आलेल्या माहितीनुसार, मालवाहू डंपरने बाईकला दिलेल्या धडकेत घटनेत वडिलांसह दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना बारामतीत रविवारी घडली होती. मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. या दुर्घटनेत ओंकार आचार्य (सणसर, तालुका इंदापूर, सध्या रा. मोरगाव रोड, बारामती) यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुली मधुरा व सई यांना आपला जीव गमवावा. ओंकार यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या दोन मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
- या घटनेनंतर आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. हा धक्का सहन न झाल्याने आणि अपघातात आपला मुलगा, दोन्ही नातींनी जीव गमावल्याच्या विरहातून राजेंद्र आचार्य यांचेही निधन झाले आहे.
नियती इतकी कठोर का? अपघातात दोन नाती-मुलाचा मृत्यू
