ब्रेकिंग! इंग्लंडविरुद्ध ड्रॉ पण…

Admin
1 Min Read
  • टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे खेळला गेलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. चौथ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या शतकी कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने दिलेला लीड तोडला. नंतर पूर्ण दिवस फलंदाजी करत टीम इंडियाचा पराभव टाळला.
  • इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. मँचेस्टर कसोटीत फलंदाजी करताना पंतच्या पायाला फ्रॅक्चर झाले. यानंतर, सर्वांच्या मनात प्रश्न होता की तो शेवटच्या कसोटी सामन्यात खेळेल की नाही, परंतु या संदर्भात बीसीसीआयने मध्यरात्री स्पष्ट केले आहे की, पंत आता या मालिकेतून बाहेर पडला आहे.

  • बीसीसीआयने पंतबाबत एक प्रेस रिलीज जारी करत म्हटले आहे की, चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान उजव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे ऋषभ पंत या मालिकेतून बाहेर आहे. त्याच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज नारायण जगदीशनचा संघात समावेश करण्यात आला आहे. कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 31 जुलैपासून केनिंग्टन ओव्हल येथे खेळला जाईल.
Share This Article