खेळ

ब्रेकिंग! एक नंबर…मोडली अहंकारी इंग्रजांची कंबर..!

  • भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहीला आहे. रविद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी केलेल्या भन्नाट बॅटींग पुढे इंग्लंडच्या गोलंदाजांनी नांगी टाकली. पहिल्या सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांनी शुभमन गिल आणि केएल राहुल यांना बाद केले. पण पुढची सर्व सत्र भारताने आपल्या नावे केली. जडेजा पाठोपाठ वॉशिंग्टन सुंदर यानेही आपले शतक पूर्ण केले. हा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात भारताला यश आले. त्यामुळे पाच कसोटी सामन्याची ही मालिका सध्या दोन एक अशा स्थितीत आहे. भारताने 425 धावा केल्या. त्या बदल्यात चार विकेट गमावल्या. जडेजा आणि सुंदरने 203 धावांना नाबाद भागिदारी केली. 
  • आज पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी सावध पवित्रा घेतला. राहुल याला आपले शतक पूर्ण करता आले नाही. तो 90 धावांवर बाद झाला. त्यानंतर गिल याने चांगली खेळी करत आपले शतक पूर्ण केले. त्याने 103 धावा केल्या. या मालिकेतील गिलचे हे चौथे शतक होते. तो 103 धावांवर बाद झाला. त्यानंतर मात्र रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसे काढली. एकाही इंग्लंडच्या गोलंदाजाला या दोघांवर वर्चस्व गाजवता आले नाही. पहिल्या सत्रात दोन विकेट गमावल्यानंतर जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी इंग्लिश गोलंदाजांना घाम फोडला. 

Related Articles

Back to top button