प्रेमात आकंठ बुडालेली महिला बॉयफ्रेंडसोबत पळाली, चार पोरांना घरीच सोडले

Admin
1 Min Read
  • एक 40 वर्षांची महिला तिच्या 24 वर्षांच्या प्रियकरासोबत पळून गेली. तरुणासोबत जीवन जगण्यासाठी या महिलेने तिचे घर सोडण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. या महिलेला चार मुले असून तिच्या लग्नाला 18 वर्ष पूर्ण झाली आहेत.
  • पत्नी प्रियकरासोबत फरार झाल्यानंतर पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेचे म्हणणं आहे की, तिला आता परत यायचे नाही. तिने विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. महिलेने माध्यमांशी बोलताना म्हटले की, मला आता तिथे राहायचे नाही. मी जिथे आले आहे, तिथेच राहायचे आहे. मला आता कुणाचीच आठवण येत नाही.
  • उत्तरप्रदेशच्या सिद्धार्थ नगरमध्ये ही घटना घडली आहे. महिला आणि तिचा प्रियकर दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. दोघांमध्ये मागील चार वर्षांपासून जवळीक वाढली होती. महिलेने म्हटले की, त्यांचे कोर्ट मॅरेजही झाले आहे. दरम्यान पतीलाही आता कोणतीही अडचण नाही. त्याने स्वत:च म्हटले की, खुशीने जात असेल, तर बिनधास्त जा.
  • पतीने सांगितले की, पत्नी याआधीही घर सोडून प्रियकरासोबत पळून गेली होती. पण त्यानंतर तिने रडत रडत माफी मागितली आणि ती परत आली होती. पुन्हा असे काही घडणार नाही, असेही ती म्हणाली होती. पण काही दिवसानंतर ती पुन्हा पळून गेली. जर पत्नी पुन्हा परत आली, तर तो पुन्हा तिला स्वीकारणार नाही. आता विश्वास नाही आहे. मुलांना घेऊन मी राहीन. तिने तिचा निर्णय घ्यावा. 
Share This Article