क्राईम

ब्रेकिंग! नियतीचा क्रूर डाव, डंपरखाली चिरडून वडिलांसह दोन मुलींचा जागीच मृत्यू

  • पुणे जिल्ह्यातील बारामतीतील मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकात आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात वडील आणि त्यांच्या दोन चिमुकल्या मुलींसह तिघाजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका डंपरला गाडी धडकून गाडी चाकाखाली गेल्याने तिघेही चेंगरले गेले.
  • आज सकाळी वर्दळीच्या ठिकाणी डंपरच्या चाकाखाली बाईक सापडल्याने तिघेही चेंगरले. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. (एम एच १६ सी ए ०२१२) या डंपरखाली ही बाईक चिरडली व अपघात झाला. या घटनेत ओंकार आचार्य (मूळ राहणार सणसर तालुका इंदापूर सध्या रा. मोरगाव रोड बारामती) यांचा जागीच मृत्यू झाला.
  • ओंकार यांच्या बाईकवर दोन मुली होत्या. यामध्ये चार वर्षाची मधुरा व दहा वर्षाची सई या दोघीही गंभीर जखमी झाल्या होत्या. मात्र, दवाखान्यात उपचारासाठी पोहोचवण्या पूर्वीच त्यांचाही मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघेही एकाच अपघातात गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

Related Articles

Back to top button