- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरु असताना आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज उद्धव यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर आता राज आणि उद्धव यांच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, उद्धवजींचा जन्मदिवस आहे, त्यांना शुभेच्छा द्यायला राज ठाकरे गेले होते ही आनंदाची गोष्ट आहे. आमच्याही शुभेच्छा उद्धव ठाकरेंना आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेल्यावर त्यात राजकारण पाहणं योग्य नाही.
- राज्याच्या मनात काय आहे ते आपल्याला विधानसभा निवडणूकीत दिसले आहे. आता महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीतही दिसेल. आता काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्राच्या मनात आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.
ब्रेकिंग! महाराष्ट्राच्या मनात काय ते तुम्हाला दिसेल
