ब्रेकिंग! राज ठाकरे वीस वर्षांनी ‘मातोश्री’वर दाखल

Admin
1 Min Read
  • शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले. दोघांमध्ये कटुता निर्माण झाल्यानंतर राज हे तब्बल वीस वर्षे मातोश्रीवर गेले नव्हते. पण दोघांमधील राजकीय कटुता मिटल्यानंतर मराठीच्या मुद्द्यावरून ते गेल्या महिन्यात एकत्र आले होते. त्यांनी विजयी मेळावा आयोजित करून जोरदार भाषणे केली होती. त्यावेळी उद्धव व राज दोघांचे कुटुंबही एकत्र दिसले होते. उद्धव यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज हे मातोश्रीवर गेले. या दोघांची गळाभेट झाली. राज यांनी मोठे बंधू उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहेत.
  • राज यांनी मातोश्रीवर हजर राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावर उद्धव यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे. ते म्हणाले, राज यांनी मला मातोश्रीवर येऊन शुभेच्छा दिल्या. त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे.
Share This Article