लातूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये छावा संघटनेच्या विजय घाडगेंना मारहाण करण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी मारहाण केली होती. त्यानंतर आता घाडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे. या भेटीत अजितदादा त्यांना काय म्हणाले? याबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अजितदादा यांच्यासोबचतच्या भेटीमध्ये काय झाले? हे सांगताना घाडगे म्हणाले की, जे झाले ते अत्यंत चुकीचे झाले असे दादांनी म्हटले. महाराष्ट्रातील राजकारणात असे व्हायला नाही पाहिजे. आरोपीवर किरकोळ गुन्हे दाखल केले, सोडून दिले. यावर अजितदादा हे लातूर पोलिसांशी बोलले, हे खपवून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. मी लातूला जाऊन SP ना भेटणार आहे. का मारले? असे दादांना थेट विचारले, आमचे काय चुकले? त्यावर ते म्हणाले की, घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. ‘त्या’ व्यक्तीला पुन्हा पक्षात घेणार नाही, असे दादांनी सांगितले.
तर कृषीमंत्री कोकाटेंच्या राजीनाम्यावर बोलताना अजितदादा म्हणाले की, माणिकराव कोकाटे यांना मंत्री पदावरून हाकलून द्या, असे म्हटले आहे. कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्यास आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करून मंगळवारपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत. दरम्यान दोन दिवसांची वेळ अजितदादा यांनी मागितली आहे.