- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज ‘महाराष्ट्र नायक’ या विशेष कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. या प्रकाशनप्रसंगी राजकारणातल्या दोन प्रमुख विरोधी नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जेष्ठ नेते शरद पवार यांनी फडणवीस यांच्या कार्याची स्तुती करत आश्चर्याचा धक्का दिला आहे. या पुस्तकात उद्धव यांनी फडणवीसांना हुशार आणि प्रामाणिक राजकारणी म्हणत केंद्रात मोठी जबाबदारी मिळू शकते, असा विश्वास व्यक्त केला. तर पवार यांनी त्यांच्या झपाट्याने केलेल्या कामगिरीवर भर देत फडणवीसांची ऊर्जा पाहून मला माझा मुख्यमंत्री कार्यकाळ आठवतो, असे भावनिक विधान केले.
- हे पुस्तक भाजप नेते गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारले गेले असून राज्यपालांच्या हस्ते त्याचे औपचारिक प्रकाशन करण्यात आलं. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण, नितीन गडकरी यांचेही लेख आहेत.
- फडणवीस यांची कार्यक्षमता अफाट आहे. ते आधुनिक विचारांचे नेते आहेत आणि आपल्या वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवत पुढे जात आहेत. त्यांच्या जोमदार कामगिरीने मला माझा पहिला मुख्यमंत्री कार्यकाळ आठवतो. त्यांची ऊर्जा पाहून एकच प्रश्न पडतो हे कधी थकत नाहीत का?. माझ्या वयापर्यंत त्यांची ही कार्यगती अशीच टिकून राहो, असे शरद पवारांनी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करताना म्हटले
ब्रेकिंग! देवेंद्रजी एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी…
