ब्रेकिंग! महाराष्ट्र हादरला

Admin
2 Min Read

एका शाळेच्या मैदानात वाद झाला. त्याचा बदला घेण्याचा डाव आखला गेला. बदला घेतला ही गेला. मित्राचाच मित्राने गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना महाराष्ट्र राज्यात घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. जालना जिल्ह्यातल्या आदिवासी आश्रम शाळेत ही घटना घडली. यात मृत झालेला विद्यार्थी हा दुसरीत शिकणारा आहे. तर त्याचा खून करणारे दोघे हे तिसरीत शिकणारे आहेत. अल्पवयीन मुलांनीच अल्पवयीन मुलाचाच खून केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्य हादरून गेला आहे.

या प्रकरणी खून केलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये गणपती इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खेळाच्या मैदानात वाद झाला.

अजय पवार या विद्यार्थ्याचा तिसरीतल्या विद्यार्थ्यां बरोबर वाद झाला होता. अजय हा दुसरीच्या वर्गात शिकत होता. त्याची बहीण गौरी ही याच शाळेत शिकते. वाद झाल्यानंतर हे सर्व विद्यार्थी शाळेच्या आदिवासी आश्रम शाळेच्या वसतिगृहात गेले. संध्याकाळचे जेवणही अजयने याच वसतिगृहात केले. त्यानंतर तो झोपण्यासाठी आपल्या खोलीत गेला. तोपर्यंत सर्व स्थिती सुरळीत होती. 

सकाळ झाल्यानंतर अजय झोपेतून उठत नव्हता. त्याला वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी उठवण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. त्याचा श्वास बंद झाला होता. त्यामुळे ते कर्मचारी घाबरले. त्यांनी वसतिगृह प्रशासनाला ही माहिती कळवली. लागलीच ही बाब पोलिसांना सांगण्यात आली. पोलिस वसतिगृहात दाखल झाले. अजयला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून घोषीत केले. 

पण अजयच्या गळ्यावर खूणा दिसत होत्या. त्यामुळे मुलाचा खून झाला असावा, असा संशय त्याच्या पालकांनी व्यक्त केला. पोलिसांनाही त्यात तथ्य दिसून आले. त्यामुळे त्यांनी याबाबत अधिक तपास केला.

चौकशी केल्यानंतर मैदानात वाद झाल्याची बाब पोलिसांना समजली. त्यांनी त्या दोन विद्यार्थ्यांकडे चौकशी केली. हे दोन्ही विद्यार्थी तिसरीत शिकतात. त्यांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी झालेला प्रकार सांगितला. अजय रात्री झोपेत असताना आपण त्याचा गळा आवळल्याचे या दोन्ही विद्यार्थ्यांनी सांगितले.

Share This Article