हवाई दलाचे एक विमान आज दुपारी दीड वाजता कोसळले आहे. एका कॉलेज कॅम्पसमधील इमारतीवर हे विमान कोसळले आहे. हवाई दलाचे हे ट्रेनिंग एअरक्राफ्ट होते. या दुर्घटनेत आतापर्यंत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तेथील अग्निशमन यंत्रणेकडून ही माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर तात्काळ बचावकार्य हाती घेण्यात आले. हे विमान कोसळल्यानंतर कॉलेज कॅम्पसमधील एका इमारतीला धडकले. त्यानंतर मोठी आग लागली. यात कॉलेजमधील सहा ते सात विद्यार्थी गंभीररित्या होरपळले आहेत. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याचे समजत आहे.
बांगलादेशची राजधानी ढाका येथे बांगलादेश हवाई दलाचे एक प्रशिक्षण जेट F-7 BJI उत्तरा परिसरातील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये कोसळले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जळत्या ढिगाऱ्याचे आणि जखमींचे फोटो दिसत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघातानंतर सर्वत्र धूर आणि ओरड सुरू होती. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.