- पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे पुन्हा एकदा मोठा हल्ला झाला आहे. रिपोर्टनुसार हल्लेखोरांनी 9 लोकांना त्यांची ओळख विचारून गोळ्या घातल्या. या बस हल्ल्यात मारले गेलेले सर्व लोक पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील आहेत. बस क्वेटाहून लाहोरला निघाली होती. बलुचिस्तानातील झोब परिसरात बस येताच बंदूकधारी हल्लेखोरांनी या बसवर हल्ला केला.
- पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांत अत्यंत अशांत आहे. येथे अशा घटना नेहमीच घडतात. असिस्टंट कमिश्नर झोब नावेद आलम यांनी सांगितले, की बंदूकधाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर झोब परिसरात एक बस थांबवली. नंतर बसमधील प्रवाशांना त्यांची ओळख विचारली. नंतर या प्रवाशांवर गोळीबार करण्यात आला. सर्व प्रवासी पंजाब प्रांतातील वेगवेगळ्या शहरांतील होते. प्रवाशांचे मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
- या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. बलूच संघटनांनी अशा प्रकारचे हल्ले याआधीही केले आहेत. त्यामुळे हा हल्ला देखील बलूच संघटनांनीच केला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रांतीय सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी या हल्ल्याला दहशतवादी घटना असे संबोधले. दहशतवाद्यांनी प्रवाशांना बसमधून खाली उतरवले आणि ओळख विचारुन गोळ्या घातल्या, असे त्यांनी सांगितले.
कर्मा रिटर्न्स!
