- देशात उद्या मोठे आंदोलन होणार आहे. देशभरातील 25 कोटींपेक्षा जास्त कर्मचारी आणि मजूर केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात भारत बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत. सरकारची सध्याची धोरणे मजूर, शेतकरीविरोधी आहेत. कॉर्पोरेट क्षेत्राला पूरक अशी ही धोरणे आहेत. त्यामुळे या धोरणांच्या निषेधार्थ दहा प्रमुख केंद्रीय ट्रेड युनियन आणि त्यांच्या सहकारी संघटनांनी हा बंद पुकारला आहे.
- या संघटनांचे म्हणणे आहे की, सरकार श्रम कायद्यांसह सार्वजनिक आस्थापनांच्या खासगीकरणापर्यंत असे अनेक निर्णय घेत आहे, जे मजूर वर्गाच्या हितांच्या विरोधात आहे. याचा मोठा फटका या वर्गाला बसणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने असे निर्णय घेऊ नयेत. याबाबतीत देशातील कामगारांच्या भावना काय आहेत, याकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
- या आंदोलनाचा देशातील बँकिंग, विमा, पोस्टल आणि कोळसा खाण, राष्ट्रीय राजमार्ग निर्माण, सरकारी विकास कामे, राज्य वाहतूक सेवा या क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. तसेच सर्व कामकाज ठप्प होणार आहे. जर असे झाले तर मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या बंदमध्ये कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
- एआयटीयूसीचे महासचिव अमरजीत कौर यांनी सांगितले की, या आंदोलनात 25 कोटींपेक्षा जास्त कर्मचारी सहभागी होतील. ग्रामीण भागातील मजूर आणि शेतकरी आपापल्या जिल्ह्यांत आंदोलन करतील.
ब्रेकिंग! उद्या भारत बंदची हाक
