अधिवेशनात भरत गोगावलेंचे स्वागतच “ओम भट् स्वाहा”ने

Admin
1 Min Read
  • सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन चालू असून विरोधकांनी या अधिवेशनात धुमाकूळ घातला आहे. या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला चांगलेच फैलावर घेतल्याचे दृश्य आहे. त्यातच आज मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषेच्या मुद्यावरून जो मोर्चा काढण्यात आला, त्यात पोलिसांकडून परवानगी नसल्यामुळे अनेक कार्यकर्ते आणि आंदोलकांना ताब्यात घेतले गेले, याचे पडसाद आज विधीमंडळात देखील उमटल्याचे बघायला मिळाले. यावेळी सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
  • आज विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून सभागृहात जाणाऱ्या सत्ताधारी पक्षातील प्रत्येक नेत्याला टार्गेट केले. प्रत्येक नेत्यासंदर्भात विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्यावरून घोषणाबाजी केली.
  • शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले सभागृहात प्रवेश करत असताना पायऱ्यांवर आल्यावर विरोधकांकडून ‘ओम भट स्वाहा’च्या जोरदार घोषणा देऊन हातवारे करण्यात आले. तर आदित्य ठाकरेंनी गोगावलेंची टॉवेल लावण्याची हुबेहूब नक्कल करत त्यांना डिवचले. गोगावले यांच्या एंट्रीलाच “ओम भट स्वाहा” च्या नाऱ्यामुळे ते सुरुवातीला काहीसे रागातच होते. मात्र नंतर त्यांनी विरोधकांना हात उंचावून अभिवादन करून हसतच सभागृहात प्रवेश केला.
Share This Article