- राज्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने एका विवाहित महिलेचा तिच्या राहत्या घरी गळा चिरुन निघृन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
- सातारा तालुक्यातील शिवथर येथे ही घटना घडली आहे. पूजा प्रथमेश जाधव असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. दरम्यान, खुनाचे कारण मात्र अस्पष्ट आहे. घटनास्थळी सातारा तालुका पोलीस दाखल झाले आहेत.
- घरात कोणीही नसताना अज्ञात व्यक्तीने संबंधित महिलेचा गळा चिरून खून करून तो पसार झाला आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. या प्रकरणातील आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तसेच या घटनेमागे नेमके कोण आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत.
राज्यात विवाहितेचा गळा चिरून निर्घृण खून
