ब्रेकिंग! भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ठेवले 608 धावांचे आव्हान

Admin
1 Min Read
  • भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलने एजबॅस्टन कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावले. गिलने 129 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकार मारून हे शतक पूर्ण केले. या शतकासह गिलने भारतीय दिग्गज सुनील गावस्कर यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सुनील गावस्कर हे एकाच कसोटी सामन्यात द्विशतक आणि शतक करणारे एकमेव भारतीय खेळाडू होते, परंतु गिलने आता हा विक्रमही आपल्या नावे केला आहे.
  • भारताने पहिल्या डावात 587 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने 407 धावा केल्या. भारताकडे पहिल्या डावात 180 धावांची आघाडी होती. या धावांचा पाठलाग करताना भारताने 6 गडी गमवून 427 धावा केल्या. यानंतर शुबमन गिलने डाव घोषित केला. तसेच इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता गोलंदाज कशी कामगिरी करतात याकडे लक्ष लागून आहे. गोलंदाजांची जादू चालली तर भारत सहज हा सामना जिंकू शकते. अजूनही शेवटचा दिवसाचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळे आता गोलंदाजीसोबत भारतीय खेळाडूंनी चांगलं क्षेत्ररक्षण करणं भाग आहे.
Share This Article