महाराष्ट्र

अवघे गर्जे पंढरपूर…! फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

  • आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूर नगरीमध्ये धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात उत्सव साजरा होत आहे. यानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा केली. त्यांच्या सोबत पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित होत्या.
  • फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल मूर्तीला दुधाचा अभिषेक करण्यात आला. खास पोशाख परिधान करून आरती करण्यात आली. पूजेनंतर त्यांनी रुक्मिणी मातेच्या मूर्तीला देखील अभिषेक अन् पूजा केली. यावेळी नाशिकच्या जातेगाव येथील मानाचे वारकरी कैलास आणि कल्पना उगले दाम्पत्य देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सन्मान शाल आणि विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या भेटवस्तूसह केला.
  • पूजेनंतर फडणवीस म्हणाले, विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.
  • यंदा शासकीय पूजेचा मान सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील पिंप्रद येथील शेतकरी दाम्पत्य बाळासाहेब पाटील आणि शोभा पाटील यांना मिळाला. फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Back to top button