ब्रेकिंग! ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर शिंदे गटात हालचाली

Admin
1 Min Read
  • हिंदी सक्तीच्या पार्श्वभूमीवर राज्यात उसळलेल्या संतापानंतर आज शिवसेना (ठाकरे गट) व मनसेने संयुक्त मेळाव्याचे आयोजन करत एकत्रित शक्ती दाखवली. वरळी डोममध्ये पार पडलेल्या या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आले.
  • यावेळी उद्धव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. एक गद्दार जय गुजरात म्हणतो, ही किती लाचारी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
  • या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मेळावा संपताच शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिंदे गटातील प्रमुख नेते दाखल झाले. खासदार नरेश म्हस्के आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी तातडीने शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी मेळाव्यानंतर लगेचच झालेली ही भेट अनेक राजकीय संकेत देत आहेत.
Share This Article