- भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेली दुसरी टेस्ट शुभमन गिलने गाजवली आहे. गिलने या टेस्टमध्ये डबल सेंच्युरी झळकावली आहे. इंग्लंडमध्ये डबल सेंच्युरी करणारा गिल हा तिसरा भारतीय आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रिया या देशात सर्वाधिक वैयक्तिक रन्स करणारा तो आशियाई कॅप्टन बनला आहे.
- गिलचा हा टेस्ट करियरमधील सर्वोच्च स्कोअर आहे. त्याचबरोबर टेस्ट कारकिर्दीमधील त्याची ही पहिलीच डबल सेंच्युरी आहे. यापूर्वी लीड्स टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये त्याने सेंच्युरी झळकावली होती. तोच फॉर्म त्याने एजबस्टनमध्येही कायम ठेवला आहे.
- गिलने 311 बॉल्समध्ये 21 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने ही डबल सेंच्युरी पूर्ण केली. इंग्लंडमध्ये डबल सेंच्युरी करणारा गिल हा तिसरा भारतीय आहे.
- गिल 269 धावांवर बाद झाला. दरम्यान गिल याने केलेल्या विक्रमी खेळीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात सर्वबाद 587 धावा केल्या आहेत.
ब्रेकिंग! जबरदस्त, खतरनाक, शुभमन गिलचे द्विशतक
