अल कायदाचा दहशतवादी हल्ला, तीन भारतीयांचे अपहरण

Admin
1 Min Read
  • कुख्यात दहशतवादी संघटना असलेल्या अल कायदाच्या दहशतवाद्यांनी तीन भारतीय नागरिकांचे अपहरण केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची भारत सरकारने गंभीर दखल घेतली आहे. आफ्रिकेतील माली देशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका सिमेंटच्या कारखान्यात काम करणाऱ्या तीन भारतीय नागरिकांना अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित दहशतवाद्यांनी अपहरण केले आहे. एका रिपोर्टनुसार अधिकाऱ्यांनी काल या माहितीला दुजोरा दिला. पश्चिम आफ्रिका खंडातील माली या देशात सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. याच दरम्यान दहशतवाद्यांनी भारतीयांचे अपहरण केले आहे. या घटनेची भारत सरकारने गंभीर दखल घेतली असून त्यांच्या सुटकेने माली सरकारने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
  • परराष्ट्र मंत्रालयाने कायेस येथील डायमंड सिमेंट कारखान्यात काम करणाऱ्या तीन भारतीयांच्या अपहरणावर चिंता व्यक्त केली आहे. ही घटना एक जुलै रोजी घडली.
  • या दिवशी हल्लेखोरांनी कारखान्याच्या परिसरात हल्ला केला आणि तीन भारतीय नागरिकांना जबरदस्तीने ताब्यात घेतले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित जेएनआयएम या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. परंतु, भारतीयांच्या अपहरणाबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 
Share This Article