- सोलापूर जिल्ह्यात आज सकाळी एक भयंकर घटना घडली आहे. या धक्कादायक बातमीमुळे सर्वांनीच हळहळ व्यक्त केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एका नवविवाहित तरुणीचा दुर्दैवी अंत झाला आहे. संबंधित विवाहित तरुणी अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली होती. यावेळी घडलेल्या एका अनर्थामुळे तिचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती माढा पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
- साक्षी रणवीर चांगभले असे मृत पावलेल्या २२ वर्षीय नवविवाहित तरुणीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचे माढ्यातील एका तरुणासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर सर्वकाही सुरळीत सुरू होते. पण आजची सकाळ साक्षीसाठी जीवघेणी ठरली.
- घटनेच्या वेळी साक्षी अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली होती. तिथे हिटर लावून पाणी गरम करायला लावला होता. यावेळी हिटरला धक्का लागल्याने साक्षीला विजेचा जोरदार धक्का बसला. त्या बाथरुममध्येच खाली कोसळल्या. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने विद्युत प्रवाह बंद केला. तसेच साक्षीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. दरम्यान रुग्णालयात जाताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी साक्षी यांना मृत घोषित केले.
सोलापूर! नवविवाहिता अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली अन्…
