क्राईम
पुणे हादरले! तरुणीवर घरात घुसून अत्याचार

- राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 25 वर्षीय तरुणीच्या तोंडावर स्प्रे मारून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये बुधवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने कुरिअर बॉय असल्याचे सांगत पुण्यातील कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये प्रवेश केला होता.
- पीडित महिलेने कुरिअर माझे नाही असे सांगितले. तरीही सही करावी लागेल, असे आरोपीने सांगितले. त्यामुळे तरुणीने घराचा सेफ्टी दरवाजा उघडला. त्यानंतर आरोपीने तरुणीच्या तोडांवर पेपर स्प्रे मारला.
- त्यानंतर आरोपीने तरुणीवर अत्याचार केला. आरोपीने एवढ्यावरच न थांबता घटनेनंतर तिच्याच मोबाईलमध्ये सेल्फी काढला आणि परत येईन असे टाईप करुन ठेवले. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.



