- काटा लगा गर्ल अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे निधन झाले आहे. शुक्रवारी सकाळी अचानक छातीत दुखू लागल्याने तिला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
- वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी शेफाली हिच्या मृत्यूने चाहत्यांना धक्का बसला आहे. तिचा फिटनेसही चांगला होता. शेफाली नियमित व्यायाम करायची. तरीही तिला अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत.
- शेफाली गेल्या सात ते आठ वर्षांपासून नियमितपणे अँटी एजिंगची औषधं घेत होती. शुक्रवारी तिच्या घरी पूजा होती. त्यामुळे शेफालीने उपवास केला होता. उपवास असतानाही तिने दुपारी अँटी एजिंग औषधांचे इंजेक्शन घेतले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गेल्या कित्येक वर्षांपासून ती ही औषधं घेत होती. दर महिन्याला ती ही इंजेक्शन घेत होती. ही औषधं हृदयविकाराच्या झटक्यामागील एक प्रमुख कारण असू शकते, असेही सूत्रांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री १० ते ११ च्या दरम्यान शेफालीची तब्येत बिघडली. तिचे शरीर थरथरू लागले आणि अचानक बेशुद्ध पडली. यानंतर तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
पूजा, उपवास अन् एका इंजेक्शनने घेतला शेफालीचा जीव?
