UPI पेमेंट, पॅन कार्ड, रेल्वे तिकीट

Admin
1 Min Read

देशात यूपीआय पेमेंटपासून ते रेल्वेच्या तिकीटांपर्यंत एक जुलैपासून मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा परिणाम सर्वांवर होणार आहे. यामध्ये यूपीआय पेमेंट, पॅन कार्ड अर्ज, तत्काळ ट्रेन तिकीट बुकिंग, जीएसटी रिटर्न आणि एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड यासारख्या बाबींचा समावेश आहे.

आत्तापर्यंत कोणत्याही व्यवहारांमध्ये चार्ज बॅकसाठी क्लेम रिजेक्ट केल्यास बॅंकेला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून परवानगी घेत पुन्हा प्रक्रिया करावी लागत होती. आता 20 जून 2025 च्या नियमांनुसार बँका स्वत: योग्य चार्जबॅक क्लेमची प्रक्रिया दुसऱ्यांदा करु शकणार आहे. त्यासाठी एनपीसीआयच्या परवानगीची आवश्यकता नसणार आहे. त्यामुळे ग्राहकांचे व्यवहार जलदगतीने होणार आहेत.

आता कोणत्याही व्यक्तीला नवे पॅनकार्ड बनवायचे असेल तर त्याला आधार कार्डची आवश्यकता आहे. आत्तापर्यंत कोणत्याही ओळखपत्र आणि जन्माच्या प्रमाणपत्रावरुन पॅनकार्डची प्रक्रिया केली जात होती. मात्र आता एक जुलैपासून आधार कार्डची आवश्यकता असणार आहे.

आता तुम्हाला रेल्वे तिकीट बुकींग करावयाचे असल्यास या प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे. एक जुलैपासून आयआरटीसी वेबसाईट आणइ मोबाईल ॲपवरुन तिकीट बुकींग करण्यासाठी आधार कार्डच्या व्हेरिफिकेशनची आवश्यकता असणार आहे. 15 जुलै 2025 पासून तिकीट बुकींगसाठी ओटीपीची आवश्यकता असणार आहे. हा नियम ऑनलाईन बुकींग आणि पीआरएस काऊंटरवरुन बुकींग करणाऱ्यांसाठी लागू आहे.

Share This Article