- सध्या जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आज सोन्याच्या किमती प्रति दहा ग्रॅम ५८० रुपयांनी घसरली आहे.
- खरं तर, लग्नाच्या हंगामात सोन्याच्या किमतीत वेगाने चढ-उतार होत असतात. मात्र, सध्या देशात सुरु असलेल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या किमती सातत्याने घसरत आहेत. ही बाब सोने खरेदीदारांसाठी दिलासादायक आहे. तर, फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याच्या किमती वाढत आहेत. त्याचवेळी, परदेशी बाजारपेठेतही बरीच हालचाल सुरू आहे. दरम्यान, भविष्यातही सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार होत राहतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-
तुमच्या शहरात आज सोन्याचा भाव काय आहे? जाणून घेऊया…
-
आज पुण्यात २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम १,००,४८० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम ९२,१०० रुपये आहे.
-
आज दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम १,००,६३० रुपये आहे आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम ९२,२५० रुपये आहे.
-
मुंबईत २४ कॅरेट – प्रति दहा ग्रॅम १,०१,११७ रुपये, २२ कॅरेट – प्रति दहा ग्रॅम ९२,७५० रुपये आहे.
ग्राहकांसाठी बंपर लॉटरी, सोन्याच्या दरात मोठा बदल
