खुशखबर ! स्वस्त झाला LPG गॅस सिलेंडर

Admin
1 Min Read
  • तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस दरांचा आढावा घेतात. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती, रुपयाची स्थिती आणि अन्य बाजार परिस्थितीच्या आधारावर किंमतीत घट किंवा वाढ केली जाते. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी गुडन्यूज मिळाली आहे. तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. 19 किलो गॅस टाकीच्या दरात 58.50 रुपयांनी कपात केली आहे. गॅसचे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. राजधानी नवी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडर आता 1665 रुपयांना मिळणार आहे. या दरकपातीमुळे हॉटेल व्यावसायिक, ढाबा आणि अन्य व्यावसायिक संस्थांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे खाद्य पदार्थांच्या किंमती कमी होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.
  • मे महिन्यातही व्यावसायिक गॅसच्या दरात कपात झाली होती. सलग तीन महिन्यांत गॅसच्या दरात कपात झाली आहे. याचा फायदा हॉटेल, रेस्टॉरंट आणि अन्य व्यावसायिक कारणांसाठी गॅस घेणाऱ्या विक्रेत्यांना होणार आहे. दरम्यान घरगुती गॅसच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 14.2 किलो घरगुती एलपीजी सिलेंडर मागील महिन्यातील दरावरच मिळत आहे.
Share This Article