ब्रेकिंग! सोलापूर शहर पाणीपुरवठ्यात दुजाभाव

Admin
2 Min Read

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात होणारा पाणीपुरवठ्याचा दुजाभाव थांबवावा व असमतोल अन्यायकारक पाणीपुरवठा प्रश्नी पालकमंत्री यांनी तात्काळ लक्ष घालून संपूर्ण शहराला समान दिवसाड, नियमित, सुरळीत, एकसमान पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी अ़ॅड. मनीश गडदे पाटील यांनी केली आहे.

सोलापूर शहरातील पाणीपुरवठा करिता समांतर जलवाहिनीचे काम अनेक नैसर्गिक, सरकारी अडथळ्यांची संकटे पार करीत एकदाची पूर्ण झाली आणि नुकतीच पाकणी/सोरेगाव येथील जलकेंद्रात पाणी पोहचले याचा मनस्वी आनंद झाला. यावर्षी निसर्गाच्या कृपेने जून महिन्यात उजनी जलसाठा 73% झाला ही सुद्धा जमेची बाजू आहे.

 

 सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेला पाणीपुरवठा शहराच्या काही विशिष्ट भागात चार दिवसाड आणि उर्वरित भागात पाच ५दिवसाड असा करण्यात येत आहे. आता तर तीन ३दिवसाड करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु शहरातील रहिवासी कुटुंबीयावर आजरोजी असमतोल पद्धतीने पाणीपुरवठा करून सोमपा अन्याय करत आहे अशी लोकभावना होत आहे. यामध्ये पाच दिवसाड पाणीपुरवठा हा हद्दवाढ भाग, झोपड़पट्टी गुंठेवारी ठिकाणी होत असल्याची नागरिकांची चर्चा आहे. खरंतर असे असेल तर ही बाब अतिशय क्लेशदायक असे आम्हाला वाटते.

 

   सोमपाच्या अखत्यारीतील संपूर्ण शहर व येथील सर्व नागरिक रहिवासी जनता ही सोमपा करीता संविधानानुसार समान आहे परंतु सोमपा प्रशासन सर्वांना समान पाणीपट्टी घेऊन सुद्धा पाणीपुरवठ्यात मात्र दुजाभाव करत आहे. शासन प्रशासन जनतेच्या प्रति असलेल्या समतेच्या तत्वांचे उल्लंघन करून घटनात्मक तरतुदींची पायमल्ली करत आहे अशी शंका वाटते. या सोमपाच्या अत्यंत गंभीर बाबीकडे ‘पालकमंत्री’ यांचे लक्ष वेधू इच्छितो.

 

   महोदय, शहराचा पाणीपुरवठा सर्व भागात एकसमान पद्धतीने व एकसमान दिवसाड झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. हा सोलापूरच्या सोशिक, सहनशील जनतेवर होणारा सरकारी अन्याय आपण गंभीर्याने नोंद घेऊन ‘पालक’ या नात्याने दूर करावा हीच आग्रही विनंती अन्यथा नाईलाजास्तव सामान्य सोलापूरकरांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने काँग्रेस पक्षाला व्यापक जनआंदोलन उभारावे लागेल याची नम्र नोंद घ्यावी. असा इशारा देण्यात आला आहे.

                      ….अ़ॅड मनीश गडदे पाटील

सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी मुंबई 

              मो. 8275302812

 manishgadade009@gmail.com

Share This Article