- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळात गेलेल्या शुभांशू शुक्ला याच्याशी खास संवाद साधला. या संवादातच मोदींनी शुक्लाला एक अनोखा होमवर्क दिला. आता आपल्याला गगनयान मिशन पुढं न्यायचे आहे. आपल्याला स्वतःचे स्पेस स्टेशन तयार करायचे आहे. चंद्रावर भारतीय अंतराळवीरांची सुरक्षित लँडिंग करायची आहे. या अभियानात तुमचा अनुभव उपयोगाला येईल, असे मोदी शुभांशूला म्हणाले.
- यावर शुभांशूनेही खास उत्तर दिले. या मिशनची ट्रेनिंग घेताना मला जे काही शिकायला मिळाले, ते मी आता आकलन करुन घेत आहे. मी ज्यावेळी माघारी येईल तो क्षण आपल्या देशासाठी निश्चितच महत्वाचा असेल. आपल्या अभियानात माझे अनुभव निश्चितच कामाला येतील त्यामुळे आपले मिशन लवकरात लवकर पूर्ण होतील, असा विश्वास वाटतो.
- दरम्यान अवकाशातून दिसणाऱ्या पृथ्वीचे वर्णन करताना शुभांशू म्हणाले, अवकाशात आल्यानंतर सर्वांत आधी पृथ्वीचेच दर्शन झाले. इतक्या लांबून दिसणारी पृथ्वी खूप वेगळी आहे. या पृथ्वीवर कोणत्या सीमा, कोणता देश दिसत नाही. आपण मानवतेचा भाग आहोत आणि पृथ्वी आपले घर आहे, एवढेच आपल्या लक्षात येते. भारताचे पहिल्यांदा दर्शन झाले, तेव्हा दिसणारा भारत हा खूप भव्य आहे.
ब्रेकिंग! ना बॉर्डर-ना देश, फक्त…पण भारत हा खूप भव्य दिसत आहे
