- अभिनेत्री शेफाली जरीवालाचे हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी रात्री निधन झाले आहे. वयाच्या 42 व्या शेफालीने अखेरचा श्वास घेतला. शेफाली सोशल मीडियावर ‘काटा लगा गर्ल’ म्हणून प्रसिद्ध होती. ती गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये फारशी सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. त्यामुळे तिच्या जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
- तर आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेफाली गेल्या 6-7 वर्षांपासून तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती, अशी माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, ती विटामीन सी आणि ग्लुटाथिओन नावाच्या औषधांचे डोस घेत होती. तरुण दिसण्यासाठी आणि त्वचेसाठी ती या औषधांचे डोस घेत होती, अशी माहिती देखील समोर आली आहे. मात्र या उपचाराचा आणि तिच्या तब्येतीवर परिणाम होईल याचा काही संबंध नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
डॉक्टरांचा मोठा खुलासा
