- राज्यात महायुती सरकारने हिंदी सक्तीचे धोरण जाहीर केले आहे. याला मराठी भाषिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध जाहीर केला जात आहे. हिंदी सक्तीवर बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले की, याच्यामध्ये भाग दोन आहे. पहिली ते चौथी प्राथमिक तिथे हिंदीची सक्ती करणे योग्य नाही. पाचवीपासून वर हिंदी येणे विद्यार्थ्याच्या हिताचे असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. साधारणत: महाराष्ट्रात लोक हिंदीच्या विरोधात नाही. मातृभाषा महत्वाची आहे. दोन्ही ठाकरेंचे वक्तव्य ऐकले. तिथं गेल्यावर मी त्यांचे म्हणणे काय आहे, ते समजून घेणार आहे.
- त्यांनी राजकीय कार्यक्रम जाहीर केले आहे. त्यात राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे म्हटले आहे. जर सहभागी व्हायचे असेल तर यामागे त्यांचे नेमकं काय धोरण आहे, ते समजून घ्यावे लागेल. कोणीही सांगेल तुम्ही सहभागी व्हा, तर सहभागी होता येणार नाही. आधी त्यांचा मुद्दा समजून घ्यावा लागेल. मला याच्यात वाद दिसत नाही, फक्त सरकारने पहिली ते चोथीपर्यंत हिंदीचा हट्ट करू नये, असेही पवार यांनी म्हटले आहे.
- राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. जर ठाकरे बंधू पूर्वीचे सगळं विसरून एकत्र येवून काही करत असेल तर काही हरकत नाही, असे शरद पवारांनी म्हटले. तर काका-पुतणे एकत्र येणार का, याविषयी बोलणे यावेळी त्यांनी टाळले.
ब्रेकिंग! ठाकरे बंधू एकत्र पण शरद पवार म्हणतात…
