क्राईम
जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून…

- बीड शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असतानाच आता शिक्षण क्षेत्रालाही हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एका नामांकित कोचिंग क्लासमधील दोन शिक्षकांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.
- पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती बीडमधील प्रसिद्ध ‘उमा किरण शैक्षणिक संकुल’ येथे ‘नीट’ परीक्षेची तयारी करत होती. एप्रिल २०२४ पासून तिने येथे क्लासेस लावले होते. जुलै २०२४ पासून प्रशांत खाटोकर नावाच्या शिक्षकाने तिच्यासोबत विकृत वर्तन करण्यास सुरुवात केली. क्लास सुटल्यानंतर तो तिला गाडीवर घरी सोडण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने घेऊन जात असे. इतकेच नाही, तर दुपारी क्लास संपल्यानंतर तो तिला एकटीला केबिनमध्ये बोलावून अश्लील स्पर्श करायचा. क्लास संपल्यानतर एकटीला बोलवून किस करायचा. माझ्या छातीला व गुप्तांगाला बॅड टच करायचा. अंगावरील कपडे काढायला लावून माझे ते फोटो काढायचे. धक्कादायक बाब म्हणजे, त्याने पीडितेला कपडे काढायला लावून तिचे अश्लील फोटो देखील काढल्याचा आरोप तिने केला आहे. कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही तो देत असे, असे पीडितेने पोलिसांना सांगितले आहे.
- या विकृत छळाबाबत पीडित मुलीने दुसरा शिक्षक विजय पवार याला सांगितले असता त्याने खाटोकरला थांबवण्याऐवजी स्वतःच पीडितेसोबत अश्लील वर्तन सुरू केले. आम्ही खाटोकरला मुलींना त्रास देण्यासाठीच ठेवले आहे, असे म्हणत पवारही तिला केबिनमध्ये एकटे बोलावून चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असे. या प्रकारामुळे क्लासमधील इतर विद्यार्थीही आपल्याकडे वाईट नजरेने बघू लागल्याचे पीडितेने सांगितले. दोन्ही नराधम शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने हा सर्व प्रकार वडिलांना सांगितला.
- वडिलांनी तातडीने बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पवार आणि खाटोकर या दोन्ही शिक्षकांविरोधात ‘पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही शिक्षकांचे राजकीय संबंध असून एक शिक्षक शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षिरसागर यांचे निकटवर्तीय मानला जातो.



