- हेडिंग्लेमध्ये खेळला जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात खूप बदल पाहायला मिळत आहेत. कधी सामन्यामध्ये इंग्लंड तर कधी टीम इंडिया पुढे जाताना दिसत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सेशनमध्ये टीम इंडियाने दोन विकेट्स मिळवल्या होत्या.
- यामध्येच भारतीय संघाचा उपकर्णधार रिषभ पंत आणि कर्णधार शुबमन गिलने अंपायर क्रिस गैफनी यांच्याकडे एक मागणी केली. ही मागणी अंपायरने ऐकली नाही, यानंतर लाइव्ह सामन्यात पंत खूप रागात दिसला.
- हेंडिंग्ले कसोटी सामन्यात एका वेळी इंग्लंड संघ खूप वेगाने धावा करत होता. हॅरी ब्रूकने प्रत्येक भारतीय गोलंदाजाविरुद्ध शानदार पद्धतीने फलंदाजी केली. तसेच कर्णाधार बेन स्टोकसुद्धा चांगला खेळत होता. त्याचवेळी पंत आणि कर्णधार गिलने अंपायरकडे खराब झालेला चेंडू बदलण्याची मागणी केली. अंपायरचे म्हणणे होते की, चेंडू तेवढा खराब झालेला नाही की त्याला बदलावा लागेल. अशा परिस्थितीत पंतला राग आला आणि त्याने अंपायर समोरच चेंडू फेकला. जे पाहून सर्व प्रेक्षक आवाज करू लागले, त्यानंतर रिषभने त्याच्या रागावर नियंत्रण मिळवले.
भारत इंग्लंड सामन्यात चेंडूवरून राडा
