देश - विदेश

बिग ब्रेकिंग! इराण- इस्त्राईल युद्धात आता भारताची एन्ट्री

  1. इराण-इस्रायल युद्धात आज अमेरिकाही उतरला. अमेरिकेने इराणच्या अणु ठिकाणांवर हल्ला केला आहे. त्यामुळे हे युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण-इस्रायलमधील सध्याचे युद्ध थांबवण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. हे युद्ध थांबावे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
  2. मोदींनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेशकियान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. या संवादाची माहिती देताना मोदींनी X वर लिहिले आहे. आम्ही सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. अलीकडील घटनांमुळे वाढलेल्या तणावाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. परिस्थिती त्वरित शांत करण्याची गरज आहे. दोन्ही देशांमध्ये संवाद आणि मुत्सद्देगिरीला चालना देण्याची गरज आहे, असे मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
  3. इराण-इस्रायल यांच्यातील युद्धात आज महत्त्वाचे वळण तेव्हा आले, जेव्हा अमेरिकेने इराणवर हल्ला केला. शिवाय इराणच्या तीन अणु केंद्रांना लक्ष्य केले. अमेरिकेने इराणमधील फोर्डो, नतांज आणि एस्फाहान येथे बॉम्ब टाकले.

Related Articles

Back to top button