देश - विदेश

पाकिस्तानने बदलले रंग; दाखवला खरा चेहरा

  1. अमेरिकेने आज इराणवर केलेल्या हल्ल्याची पाकिस्तानने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पाकिस्तानने म्हटले आहे की, अमेरिकेचा हा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. इराणच्या अणु ठिकाणांवर हल्ला करणे चुकीचे आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करणारा पाकिस्तान हा पहिला देश नाही. पाकिस्तान आधी सौदी अरेबिया, क्युबा आणि चिलीनेही या हल्ल्याचा निषेध केला आहे. तर इंग्लंड आणि युरोपियन युनियनने अमेरिकेच्या या हल्ल्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने ही आरपारची लढाई सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
  2. इंग्लंडने अमेरिकेला पाठिंबा देत म्हटले की, जे काही केले आहे ते योग्य आहे. इराणने चर्चेसाठी पुढे यायला पाहिजे. तर युरोपियन युनियनने अमेरिकेच्या हल्ल्याचे समर्थन करत म्हटले की, इराणचा अणु कार्यक्रम आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे. शिवाय अणू कार्यक्रमासाठी इराणला परवानगी दिली जाऊ नये, असेही युरोपीयन युनियनने म्हटले आहे.
  3. दरम्यान पाकने अमेरिकेचा निषेध केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एक दिवस आधीच पाकने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 2026 चा नोबेल शांतता पुरस्कार द्यावा, यासाठी अधिकृतपणे त्यांना नामांकित केले होते.
  4. पाकिस्तान सरकारने एक अधिकृत निवेदन जारी करून याची पुष्टीही केली होती. त्यामुळे पाकिस्तानने आता आपले रंग कसे बदलले हे जगाला पाहाता आले आहे. एकीकडे अमेरिकेला चुचकारायचे तर दुसरीकडे त्यांचाच निषेध करायचा हे पाहायला मिळाले आहे. 

Related Articles

Back to top button