देश - विदेश

ब्रेकिंग! इराण-इस्रायल युद्धादरम्यान भारताची स्मार्ट खेळी

  • इराण आणि इस्रायलमध्ये सध्या सुरु असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. खासकरुन कच्च्या तेलाच्या किंमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, आता भारताने एक मास्टरस्ट्रोक खेळला आहे. इराण आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये तेलाचे मोठे साठे आहेत. या देशांमधून जगभरात तेलाचा पुरवठा केला जातो. मात्र, आता या युद्धामुळे तेल बाजारात खळबळ उडाली आहे. आता भारताने मास्टरस्ट्रोक खेळत रशियाकडून तेल आयात वाढवली आहे. जूनमध्ये भारताने रशियाकडून विक्रमी प्रमाणात तेल खरेदी केले, जे सौदी अरेबिया आणि इराकसारख्या देशांकडून घेतल्या जाणाऱ्या तेलापेक्षा जास्त आहे. याचाच अर्थ भारताने रशियाच्या मदतीने आपला तेलसाठा वाढवण्याचे काम केले आहे.
  • केप्लर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जूनमध्ये भारताने रशियाकडून दररोज 20-22 लाख बॅरल तेल आयात केले. गेल्या दोन वर्षांतील हा आकडा सर्वाधिक आहे. याआधी मे महिन्यात हा आकडा 19.6 लाख बॅरल प्रतिदिन होता. यात आता वाढी झाली आहे. भारताने रशियाकडून इतके तेल खरेदी केले की, ते इराक, सौदी अरेबिया, युएई आणि कुवेतमधून आयात होणाऱ्या एकूण तेलापेक्षा जास्त आहे. यामुळे युद्धामुळे तेलाचे बाजार वाढले तरी भारताला फारसा फरक पडणार नाही.

Related Articles

Back to top button