- संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीने दोन दिवस पुण्यात मुक्काम केल्यानंतर आज सकाळी दोन्ही पालख्या आपल्या पुढील मुक्कामासाठी रवाना झाल्या. पुणे ते सासवड असा 32 किलोमीटरचा मार्ग वारकरी पार करतील.
- त्यानंतर सासवडला मुक्काम करणार आहेत. मात्र वारीसंदर्भात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आज वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आझमी यांच्या वक्तव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
- नागपुरातील मुख्यमंत्री सचिवालयात असलेल्या हैदराबाद हाऊसमध्ये आज कुंभमेळ्याच्या अनुषंगाने रस्ते विकासावर बैठक झाली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांना अबू आझमी यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर फडणवीस म्हणाले की, अबू आझमी यांना वादग्रस्त विधान करण्याचा शौक आहे. वादग्रस्त विधान केले की प्रसिद्धी मिळते, असे त्यांना वाटते. परंतु अबू आझमी यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नसल्यामुळे त्यांच्या फालतू वक्तव्याला मी उत्तर देणार नाही, असे म्हणत फडणवीस यांनी जास्त बोलणे टाळले.
- दरम्यान आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात? याची तक्रार केलेली नाही. पण ज्यावेळी मशीद पूर्ण भरते, तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटं रस्त्यावर नमाज पठण करतात. अशावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठण केले तर पासपोर्ट रद्द करू. तर दुसरीकडे मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं की, लवकर जा अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, तरीही आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते. याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिम लोकांच्या बाबतीत अशा गोष्टी करत आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य अबू आझमी यांनी केले.
वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही नमाज पठण केलो तर…अबू आझमींचे वारीसंदर्भात सोलापुरात वादग्रस्त विधान
