राजकीय
सत्तारांचे कपडे फाडणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादेत माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्याविरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.
परंतु आता राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रेखा तौर यांनी सत्तार यांचे कपडे फाडणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. सत्तार यांनी केवळ सुळेंचाच नाही तर महाराष्ट्रातील तमाम स्त्रियांचा अपमान केला आहे.
सुळे यांच्याजवळ इतकं आहे की, त्या सत्तार यांच्या सात पिढ्या विकत घेऊ शकतात. त्यांनी पन्नास खोके ओरबाडून आणले आहेत. त्यामुळे सत्तार जिथं दिसतील त्यांचे कपडे फाडा, जो कुणी त्यांचे कपडे फाडेल त्याला मी दहा लाख रुपयांचे बक्षीस देईल, असे तौर म्हणाल्या.