क्राईम
ब्रेकिंग! संजय राऊत इज बॅक, जामीन अर्ज अखेर मंजूर

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 100 दिवसांनंतर राऊत यांना पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने राऊतांनी जामिनासाठी अर्ज केले होते.
राऊत यांच्यासह प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी राऊत यांना 31 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून राऊत हे तुरुंगात आहेत. अटक केल्यानंतर राऊत यांना पहिले ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या अटकेनंतर राऊत हे आर्थर रोड कारागृहामध्ये आहेत.