सोलापूर

टायगर इज बॅक! राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर अंधारेंना अश्रू अनावर

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला आहे. 100 दिवसांनी पीएमपीएल कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. 2 लाखांच्या जातमुचलक्यावर राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. यावर ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे यांनी ‘टायगर इज बॅक’ हे नवं ट्विट केलं आहे. दरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना अंधारे यांना आनंदाश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

यस टायगर इज बॅक..आमचे सेनापती परत आले आहे. तुम्ही फार वाघाला कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केलात, मात्र तुम्ही नाही कोंडून ठेऊ शकलात. कूटकारस्थान, कपटनिती, राजकारण, कुटीलनिती, सर्व स्वायत्त यंत्रणा हे सगळ निष्प्रभ ठरलं आहे. राऊतसाहेब परत आले, आमच्यासाठी आज दिवाळी आहे, अशी प्रतिक्रिया अंधारे यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button