राजकीय

मला आजपासून छोटा पप्पू म्हणा ; आदित्य ठाकरे

मी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्या जागेवर असतो तर राजीनामा देऊन निवडणुकांना सामोर गेलो असतो. त्यामुळे हिंमत असेल तर निवडणुकांना समोर जाणार का? असं ओपन चॅलेंज युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिलं आहे. 

माझा या घटनाबाह्य सरकारला हाच प्रश्न आहे की, महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला कसे गेले? प्रत्येक राज्य हे आपल्याच देशातील आहे. मात्र जी संधी महाराष्ट्राला भेटली ते तिकडे गेले म्हणून मला राग येतो, असं आदित्य म्हणाले.
महाराष्ट्रातल्या विषयातल्या पोरांना हे शेंबडी पोरं म्हणतात. अब्दुल सत्तार गद्दार मला छोटा पप्पू म्हणतात. शेतकऱ्यांना मदत करा, मी छोटा पप्पु आहे मान्य करेल, असंही ते म्हणाले.  राज्याबाहेरून अनेकांना ही आपण रोजगार देऊ शकत होतो. घटनाबाह्य गद्दार, मुख्यमंत्री यांनी आम्हाला सभागृहात आश्वासन दिलं होतं. 4 लाख कोटींचं प्रकल्प देऊ. मात्र, ते खोक्यात अडकले, असंही आदित्य म्हणाले.

Related Articles

Back to top button