महाराष्ट्र
खुशखबर | पोलीस भरतीची प्रक्रिया पुन्हा सुरू होणार

पोलीस भरतीची प्रक्रिया पुन्हा सुरु होणार आहे. राज्यातील अनेक वृत्तपत्रांतून यासंबंधीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पोलीस भरतीसाठी 9 नोव्हेंबरपासून उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. ज्या उमेदवारांनी कोरोना काळात पोलीस भरतीचा अर्ज भरला, अशा उमेदवारांना या भरतीत जागा मिळेल का, असा प्रश्न होता. गृहविभागाने या उमेदवारांकरिता मोठा निर्णय घेतला आहे. या उमेदवारांना पोलीस भरतीची संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्य सरकारतर्फे महाराष्ट्र पोलीस भरतीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवार अर्ज भरतेवेळी फक्त एकाच पदासाठी एकच अर्ज करू शकतात. राज्यभरात 18 हजार 331 पोलिसांची भरती होणार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसंच नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत सर्व उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.