वाहनधारकांसाठी खुशखबर

Admin
1 Min Read
  • देशातील वाहनधारकांसाठी एक खुशखबर आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आज वाहनधारकांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. 15 ऑगस्टपासून एका नियमात बदल होणार आहे. 15 ऑगस्टपासून FASTag बाबतच्या नियमात बदल होणार असून आता वाहनचालक फास्टटॅगचा वार्षिक पास बनवू शकणार आहेत. हा पास वार्षिक तीन हजार रूपयांचा असेल, अशी घोषणा गडकरींनी केली आहे. वार्षिक पासच्या घोषणेमुळे लाखो खाजगी वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
  • १५ ऑगस्टपासून खाजगी वाहनांसाठी (जसे की कार, जीप, व्हॅन इ.) तीन हजार रूपयांचा फास्टॅग आधारित वार्षिक पास जारी केला जाईल. हा पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून एक वर्ष किंवा दोनशे ट्रिपसाठी, जे आधी असेल ते वैध असेल. या पाससाठी लवकरच एक स्वतंत्र लिंक NHAI आणि MoRTH च्या वेबसाइटवर आणि ‘हायवे ट्रॅव्हल ॲप’ वर उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे पासचे सक्रियकरण आणि नूतनीकरण सोपे आणि सोयीस्कर होईल, असे गडकरी यांनी म्हटले आहे.
  • नवीन वार्षिक पास धोरणाचा उद्देश ६० किमीच्या परिघात असलेल्या टोल प्लाझांशी संबंधित दीर्घकालीन समस्या सोडवणे आहे. एकाच डिजिटल व्यवहाराद्वारे टोल पेमेंट सोपे करणे, टोल प्लाझावरील प्रतीक्षा वेळ कमी करणे, गर्दी कमी करणे आणि वादाचे प्रसंग टाळणे यासाठी होणार आहे.
Share This Article