जी ७ शिखर परिषदे दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरम्यान फोनवरून चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये 35 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेदरम्यान भारत-पाक युद्धात भारताने कोणाची मध्यस्थी स्वीकारली नाही. ती स्वीकारत नाही आणि भविष्यातही ती स्वीकारणार नसल्याचे खडेबोल सुनावले.
ट्रम्प यांनी दावा केला होता की, भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावात त्यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर दोन्ही देशांनी युद्धविरामावर शिक्कामोर्तब केले. आपल्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाल्याचा ट्रम्प यांच्या दाव्याची आता मोदींनी हवाच काढून टाकली.
या चर्चेच्यावेळी दोघांमध्ये ऑपरेशन सिंदूर ते इराण-इस्रायल युद्धापर्यंतच्या विषयांवर चर्चा झाली. ट्रम्प यांनी मोदींना कॅनडावरुन अमेरिकेला बोलावले. पण मोदींनी अमेरिकेला जायला असमर्थता व्यक्त केली. त्याचवेळी मोदींनी ट्रम्प यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले.