- इस्रायल इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धात दररोज दोन्ही बाजूला खूप नुकसान होत आहे. इस्रायलमध्ये तेल अवीव आणि हायफा या दोन शहरात मोठे नुकसान झाले आहे. इराणमध्ये तेल प्रकल्प, सैन्य तळ, लष्करी अधिकारी यांना लक्ष्य केले जात आहे. इस्रायलच्या बाजूला जीवितहानीचा आकडा कमी आहे. इराणमध्ये जीवितहानीचा आकडा जास्त आहे आणि बडे लष्करी अधिकारी मारले जात आहेत. दरम्यान या युद्धात आतापर्यंत तटस्थ दिसत असलेल्या अमेरिकेने उतरण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल माीडियावर पोस्ट करुन इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांना सरेंडर म्हणजे शरणागती पत्करायला सांगितली आहे. पण खामेनेई यांनी अमेरिकेचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.
- अयातुल्ला यांनी आज सकाळी एकापाठोपाठ एक टि्वटस केले. त्यांनी इस्रायलला ‘दहशतवादी झायोनिस्ट रेजीम’ म्हटले. तसेच आता युद्धाची सुरुवात झाली, असे लिहिले आहे. ट्रम्प यांच्या धमकीला जुमानणार नसल्याचे अयातुल्ला यांनी एकप्रकारे संकेत दिले आहेत. दहशतवादी झायोनिस्ट रेजीमला आपण कठोर प्रत्युत्तर दिलेच पाहिजे. आम्ही झायोनिस्टना दया दाखवणार नाही, असे अयातुल्ला यांनी लिहिले आहे.
- आज सकाळी इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाइल्सनी हल्ले केल्यानंतर आज अयातुल्ला यांनी हे टि्वट केले. फारसी भाषेत खामेनेई यांनी ‘युद्धाची सुरुवात’ असे लिहिले. सोबत कॅस्टले गेटमध्ये एक माणूस हातात तलवार घेऊन जातानाचा फोटो त्यांनी पोस्ट केला आहे. ऐतिहासिक खैबरच्या लढाईचा हा फोटो असल्याचा दावा टाइम्स ऑफ इस्रायलने केला आहे.
ब्रेकिंग! युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही
