सोलापूर
सोलापूर! डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या का केली?

- सोलापूरचे प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. दरम्यान या आत्महत्या प्रकरणात सोलापूर पोलिसांनी 720 पानांचे आरोपपत्र सोलापूर कोर्टात सादर केले आहे. डॉ. वळसंगकर यांच्या एस. पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेसच्या प्रशासकीय अधिकारी असलेल्या मनिषा माने- मुसळे यांनी आत्महत्येस प्रवृत्त केले, असे पोलिसांनी या आरोपपत्रात स्पष्ट केले आहे.
- 18 एप्रिल रोजी डॉ. वळसंगकर यांनी सोलापूरच्या मोदी परिसरातील त्यांच्या निवासस्थानी स्वतःच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या खिशात सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये मुसळे यांच्यामुळे आर्थिक बाबींवरून तीव्र तणाव असल्याचा आरोप केला होता.
- पोलिस तपासात एस. पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेसमध्ये मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांचा खुलासा झाला आहे. यामध्ये माने यांची प्रशासकीय भूमिका महत्त्वाची होती. लाखो रुपयांचे संशयास्पद बँक व्यवहार माने यांच्याशी संबंधित खात्यांशी जोडले गेले, ज्यामुळे डॉ. वळसंगकर यांच्या तणावाला कारणीभूत ठरले.
- पोलिसांनी 42 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आणि आरोपपत्रात मुसळे यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांचे आणि त्यांच्या अधिकार काढून घेतल्यानंतर डॉक्टर आणि रुग्णालयाची बदनामी करण्याच्या धमक्यांचे पुरावे समाविष्ट आहेत.



